शाळा हे संस्काराचे केंद्र - PSI मा. आशिष चौधरी प्रवरेच्या PGEMS मध्ये 'विद्यार्थी मंत्रिमंडळ' पदग्रहण समारंभ संपन्न
- Neel Writes

- Jul 23
- 1 min read
लोणी: प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अॅड ज्युनियर कॉलेज, लोणी येथे विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी पोलीस स्टेशनचे PSI मा. आशिष चौधरी होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आजचा विद्यार्थी उद्याचा सुजान नागरिक आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनविण्यासाठी शाळा अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. संस्कारक्षम नागरिक घडविणारी शाळाच ही प्रमुख केंद्रे आहेत."

याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया समजावी, लोकशाही पद्धतीची ओळख व्हावी आणि नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने शाळेत प्रथम मतदान प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली. यातून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना शिस्त, विद्यार्थी पुढाकार आणि समस्या मांडणे आदी जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊन त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी विद्यालयाचा व कुलाचा ध्वज विद्यार्थ्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना बॅज प्रदान करण्यात आले.

हा कार्यक्रम प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अति. कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे आणि शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. त्यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

शिस्तबद्धता, नियोजन आणि सजावट हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सूत्रसंचालन कु. आर्या भालेकर आणि कु. अर्शीन शेख या विद्यार्थिनींनी केले. आभार सौ. राजश्री खर्डे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री. रविंद्र भणगे, श्री. अनिल पिंपळे आणि कु. प्रज्ञा कानडे यांनी उत्तमरित्या केले.




Comments