google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

डॉ. प्रवीण डुंबरे यांच्या प्रतिबिंब या ललित लेखन संग्रहास मिळाला राज्यस्तरीय पुरस्कार.

साहित्यिक डॉ. प्रवीण डुंबरे ओतूर (पुणे) यांच्या प्रतिबिंब या ललित लेखन संग्रहास राज्यस्तरीय संत गाडगे महाराज ललित लेखन पुरस्कार शनिवार दि. ७ जून २०२५ रोजी वेदशास्रोत्तेजक सभागृह, सदाशिव पेठ पुणे येथे प्रदान करण्यात आला.


या समारंभास जग बदलणारा माणूस या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ हे स्नेहसंमेलनाध्यक्षपदी, ज्येष्ठ साहित्यिक हनुमंत पडवळ हे प्रमुख पाहुणे म्हणून तर इंदू फार्मा कंपनी पुणेचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून लाभले होते.


संत गाडगे महाराज विचार मंच ओतूर पुणे यांच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मांजरी पुणे यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त, झालेल्या समारंभात पुस्तक प्रकाशन व राज्यभरातील साहित्यिकांच्या विविध साहित्य कृतींना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर काव्य लेखन, गझल लेखन तर संत गाडगे महाराज काव्य, कादंबरी, चरित्र, संत साहित्य, बाल लेखन, ललित लेखन ,ज्ञानज्योत काव्य गौरव, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले काव्यरत्न पुरस्कार ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर काव्यरत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्रदान करण्यात आले.


याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपादिका कांचन मून यांच्या अस्तित्व 'ती' चे या प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे, तर ज्येष्ठ लेखिका सुभा लोंढे यांच्या मानवतेचे पुजारी या लेखसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संत गाडगे महाराज विचारमंच संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष रणजीत पवार ,अध्यक्ष खं. र. माळवे तर ज्ञानज्योत फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कविता काळे, संस्थापक कार्याध्यक्षा कांचन मून यांनी या दिमाखदार सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते. याप्रसंगी मार्गदर्शक रघुनाथ कांबळे, विमलाबाई लुकंड महाविद्यालय गुलटेकडीचे मुख्याध्यापक संदीप सातपुते, रेखाताई फाले, शुभांगी शिंदे, बाळासाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्योत्स्ना काळे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.


सुरुवातीला सकाळी दहा ते अकरा यावेळेत झालेल्या काव्य संमेलनात एकूण दहा कवींनी सहभाग घेतला होता. काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन प्रतिमा काळे यांनी केले तर प्रसिद्ध गझलकार बाळासाहेब गिरी यांनी काव्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले.


दिमाखदार झालेल्या या साहित्यिक सोहळ्याचे प्रास्ताविक कांचन मून, आभार रणजीत पवार आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाण्याचे प्रसिद्ध साहित्यिक संजय गवांदे यांनी अत्यंत खुमासदार पद्धतीने आणि ओघवत्या भाषेत केले.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2021-2026 | Neel Writes | All Rights Reserved

bottom of page