google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस एस. पूनावाला स्कूलमध्ये रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन

पुणे - डॉ. सायरस एस. पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल , रस्ता पेठ पुणे येथे ओमोटेक कंपनी मार्फत रोबोटिक लॅबोरेटरी चे पूर्ण सेटअप पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी बक्षीस पात्र स्वरुपात प्रधान करण्यात आले .

सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक विद्यार्थी हा या तंत्रज्ञानाशी जोडलेला असावा या उदेशाने ही रोबोटिक प्रयोगशाळा ओमोटेक कंपनीचे सस्थापक व कार्यकारी अधक्ष्य श्री शेखर जैन व त्यांच्या सुविध्य पत्नी रितू जैन यांनी हा निर्णय घेतला .





समाजातील अत्यंत तळागाळातील मुलांना याचा लाभ व्हावा हा या मागचा एक मोठा उदेश आहे.

कार्यक्रमामध्ये एड्यूड्रोन या शैक्षणिक फोरम च्या संस्थापक सौ. काजल छातीजा यांचे मोठे योगदान आहे , त्यांनी मुखधापिका सौ. माधुरी चोळके यांच्याशी संवाद साधून, विद्यार्थ्यांची संख्या व रोबोटिकची उपलब्धता व गरज बघून इयत्ता नर्सरी ते 7 वीच्या १४०० विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची उपलब्धता करून दिली.


यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री वालचंद संचेती, कैंप एजुकेशन सोसायटीच्या मैनेजिंग कमिटी चे सदस्य व शाळेचे सचिव माननीय सुभाष अग्रवाल तसेच माननीय इम्तियाज मुल्ला, हे मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य निकुंब सर , सुनीता जैन , नीलिमा जाधव , काजल सोमाई यांनीही उपक्रमाची कौतुक केले.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

© 2021-2026 Neel Writes. All rights reserved

bottom of page