google.com, pub-6989026767761931, DIRECT, f08c47fec0942fa0
top of page

प्रवरेच्या PGEMS मध्ये आजी-आजोबा दिवस उत्साहात साजरा

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणी येथे आजी-आजोबा दिवस मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.



संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, संस्थेचे अति. कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून संस्थेचा व विद्यालयाचा कार्यक्रम घेण्यामागील हेतू स्पष्ट केला. आजच्या मुलांना मोबाईलचे वेड लावण्यापेक्षा त्यांना आजी आजोबा सोबत मनसोक्त गप्पा मारू द्या. त्यांचे संस्कार हीच पुढील जीवनासाठी मुलांना शिदोरी ठरणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आजी आजोबांचे त्यांनी अभिनंदन केले.



या प्रसंगी श्री. चंद्रभान शेळके, लता शेळके, सौ. अलका खर्डे, रमेश काळवाघे, लीला काळवाघे यांची उपस्थित आजी आजोबांमधून अध्यक्ष म्हणून करण्यात आली होती उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.



उपस्थित आजी-आजोबांप्रती असलेले प्रेम विद्यार्थ्याने भाषणातून, नृत्यातून व नाटीकेतून व्यक्त केले. आजी-आजोबांच्या प्रेम, त्याग आणि संस्कारांवर आधारित हे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


कार्यक्रमादरम्यान आजी-आजोबांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये आजी-आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्राचार्याच्या उपस्थितीत बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निलेश पर्वत, श्री. संदीप आहेर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्री. किसन अडसूळ यांनी मानले



कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

© 2021-2026 Neel Writes. All rights reserved

bottom of page