प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, लोणी येथे "कर्टन कॉल" आंतरशालेय इंग्लिश नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न
- Neel Writes

- 6 days ago
- 1 min read
प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणी यांच्या वतीने आयोजित*"कर्टन कॉल" आंतरशालेय इंग्लिश स्किट स्पर्धा २०२६-२७* चे आयोजन *गंगूबाई स्टेडियम, लोणी* येथे दि. १८ जुलै २०२६ रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले.

या स्पर्धेसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, डॉ .शिवानंद हिरेमठ ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , शालेय शिक्षण विभाग संचालिका सौ लीलावती सरोदे , संचालक अतांत्रिक विभाग डॉ. प्रदीप दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रथम क्रमांक: प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, प्रवरानगर, द्वितीय क्रमांक: प्रवरा हायस्कूल, कोल्हार व तृतीय क्रमांक: प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज, लोणी या शाळेने पटकावला.
उत्कृष्ट नायक प्रेम कदम (सैनिक स्कूल)व उत्कृष्ट नायिका आर्या भालेकर (पीजीईएमएस) यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित उत्कृष्ट नाटिका सादर करून आपली कलात्मकता, सर्जनशीलता आणि सांघिक भावना दाखवून दिली असे शाळेच्या प्राचार्या डॉ. रेणू पाटील यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी प्रा. श्रीकांत सुसर व प्रा. डॉ.रोहिणी कासार यांनी सर्व सादरीकरणांचे बारकाईने मूल्यांकन व उत्तम परीक्षण केले.
नाट्यमय सजावट , वेशभूषा यामुळे संपूर्ण वातावरण "कर्टन कॉल" सारखे वाटत होते.

पी जी ई एम एस च्या प्राचार्या डॉ.रेणू पाटील व पिकेव्हीएमच्या प्राचार्या सौ. विद्या गाडे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य आणि वक्तृत्वाचे महत्त्व विशद केले.
आभार प्रदर्शन सौ.हर्षदा नेहे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या संघांना आणि सर्व सहभागींना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव वाढविणारा ठरला. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन इंग्रजी विभागाचे शिक्षक सौ राजश्री खर्डे, श्री जालिंदर गाडे, श्री बाळासाहेब गायकर सर यांनी केले.




Comments