मुळशी तालुक्यातील हेरिटेज स्कूल मधील स्काऊट गाईड पथक पोहोचले वर्षारंभ मेळाव्यानिमित्त खेड शिवापुर ‘भात लावणी’ उपक्रमात.
- Neel Writes

- Jul 22, 2025
- 2 min read
कासारआंबोली पुणे: १९ जुलै:
पुणे भारत स्काउट्स आणि गाईड जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विविध शाळांमधून तालुकास्तरीय मुळशी मधील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मधील १० स्काऊट व १० गाईड पथकाने वर्षारंभ मेळाव्यानिमित ‘खेड शिवापूर’ येथील शेतात जाऊन भात लावणी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन व अगदी मनापासून काम करून भात लावणीचा मनसोक्त आनंद घेतला.यामध्ये हेरिटेज शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. रेणू पाटील यांनी मुलांना सहभाग घेण्यास प्रवृत्त करून मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच हेरिटेजच्या स्काऊट व गाईड पथकासोबत स्काऊट शिक्षिका सौ.प्राजक्ता अमराळे व गाईड शिक्षिका सौ.रितू महिरे या देखील स्काऊट व गाईड पथकासोबत उपस्थित होत्या. खेड शिवापूर येथे पोहचल्यावर प्रथम आपल्या पथकासोबत त्यांनी सुरुवातीला प्रार्थनेने सुरुवात करून स्काऊट गाईडचे वचन विधी व स्काऊट व गाईडचे नियम समजावून सांगून ह्या कार्यक्रमास सुरवात केली.

स्काऊट व गाईड पथकाच्या भात लावणी कार्यक्रमासाठी शाळेने वर्षारंभ मेळाव्याचे औचित्य साधून मुलांना समजून सांगण्यासाठी स्काऊट व गाईडचा उद्देश म्हणजे,मूल्य आधारित नैतिक शिक्षण तसेच समाजाप्रती असणारी आपली कर्तव्यनिष्ठता शिस्तबद्धता नैसर्गिक प्रेम यांसारख्या संस्कार घडविणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची ओळख व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्काऊट व गाईड चळवळीचे सर्वेसर्वा ‘लॉर्ड बेडन पावेल’ यांची देखील माहिती देत असताना यांनी या चळवळी मधून चारित्र्य स्वावलंबन, आरोग्य व सेवा या मूल्यांची जोपासना करून मुला-मुलींच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांचा विकास, चारित्र्यसंवर्धन,आरोग्य खेळाडू वृत्ती, सेवाभाव निर्माण करून देशाचे उत्तम नागरिक घडावे ह्यासाठी शिक्षणाचा उद्देश आहे हे सांगितले.

कासारआंबोली येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमधील मुख्याध्यापिका डॉ.रेणू पाटील यांनी आपल्या विद्यार्थ्यांप्रति सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी व समाजाविषयी आपण पूरक कसे ठरू शकतो? यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी या कार्यक्रमाला प्रतिसाद व मार्गदर्शन केले.

यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भिलारे , सचिव संगीता भिलारे संचालक कुणाल भिलारे, यशस्विनी भिलारे मॅडम यांनी स्काऊट व गाईड पथकाला शिक्षणासाठी व शिस्तीसाठी प्रोत्साहन दिले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.




Comments